" नाही गं सहन होत आई हा अबोला तुझा
सांगूनच चुकले अंतर्मनातील भाव सारा माझा ,
त्या चार गोष्टी आणि ते मोकळे बोलणे कसे गं विसरू
मनातील तुझ्या रुसवा कसा मी नष्ट करू !!
तुझे कोमल बोलणे आणि सुंदर हसणे
तुझ्या डोळ्यांतील अश्रू सांगतात तुझे बोलणे ,
जन्म दिलास तू खूप वेदना सहन करून
माफी मागते गं त्या वेदनांची जाणीव ठेवून...
चुकले माझेच पण अश्रू तू का साहतेस ??
तुझ्या अश्रूंनी वार माझ्या काळजावर करतेस ,
तूच सोबती , तूच मन , 'तूच' माझी आहेस ,
मी तुझी 'सावली' असे तूच एकदा वदलेस...
विश्वास माझा तुझ्यावरचा अजूनही तसाच आहे
तू मात्र अशी 'अश्रूंनी चिंब' हे मला न साहे ,
परतुनी ये माझ्या माऊली तू माझ्यासाठी
मी जन्मच घेतलाय 'फक्त तुझ्यासाठी'....
फेडू कसे ऋण मी तुझे कळतंच नाही
प्रेम तुझे नि माझे नेहमी अथांग राही ,
सोड गं राग अन अश्रू डोळ्यांतले
तू असावी आनंदी हेच भाव माझ्या मनातले ......
तू असावी आनंदी हेच भाव माझ्या मनातले......"
शामल
Shamaldeepa00@gmail.com
This comment has been removed by the author.
ReplyDeleteशामल ..
ReplyDeleteबस्स हा आता मला तर रडू येतंय तुझ्या अश्या बोलण्याने.
खूप भाग्यवान आहे ती आई जिला तुझ्यासारखी मुलगी भेटली. 😢😢
.. निशब्द !
भारी 🙌
ReplyDeleteभारी 🙌
ReplyDelete